शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल निकम यांच्याशी गृहराज्यमंत्र्यांकडून संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:41 IST

सांगली : अनिकेत कोथळे खून-खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पण अजूनही शासनाने निकम यांच्याकडे याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. त्यामुळे निकम यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश निघालेला नाही.सांगली शहर पोलिसांनी ५ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक केली होती. ...

सांगली : अनिकेत कोथळे खून-खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. पण अजूनही शासनाने निकम यांच्याकडे याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही. त्यामुळे निकम यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश निघालेला नाही.सांगली शहर पोलिसांनी ५ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करुन त्याला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील जंगलात जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांना अटक केली आहे. या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. पोलिस ठाण्यासमोर आंदोलने झाली. सांगलीकरांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अनिकेतच्या नातेवाईकांनीही निकम यांच्या नियुक्तीचा आग्रह धरला आहे.गहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री सुभाष देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर या नेत्यांनी मृत अनिकेतच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या खटल्यात अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करु, असेही या नेत्यांनी सांगितले होते. मात्र अजूनही निकम यांची नियुक्ती करण्यासाठी शासनाने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. कोथळे कुटुंबीयही सातत्याने निकम यांच्या नियुक्तीची मागणी करीत आहेत. पण प्रत्यक्षात शासकीय स्तरावर अजून तरी त्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत.चौथा खटला ठरणारअ‍ॅड. निकम यांचे सांगलीशी जुने नाते आहे. १९९८ मध्ये सांगलीत अमृता देशपांडे या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाला होता. या खून-खटल्याचे काम निकम यांनी पाहिले होते. तसेच २००४ मध्ये झालेल्या मिरजेतील रितेश देवताळे या शाळकरी मुलाच्या खून-खटल्याचे कामही त्यांनीच पाहिले होते. या दोन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेप झाली होती. सध्या निकम यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील पळशी (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खुनाचा खटला आहे. आता अनिकेत कोथळे प्रकरणात त्यांची नियुक्ती झाल्यास त्यांचा जिल्ह्यातील हा चौथा खटला असेल.अनिकेत कोथळेचा पोलिसांनी कोठडीत खून करुन त्याचा मृतदेह जाळल्याची घटना समजली आहे. सध्या मी कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व तिच्या खुनाच्या खटल्याचे काम पाहत आहे. कोपर्डी येथे शनिवारी शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी भेट झाली. त्यांनी अनिकेत कोथळे प्रकरणाची माहिती दिली. सांगालीकरांनी हा खून-खटला तुम्ही चालवावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. पण शासनस्तरावरुन अजूनही अधिकृत कोणताही आदेश निघालेला नाही. - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

टॅग्स :Crimeगुन्हा